FASTag Annual Pass : टोल नाक्यापासून २० किमी परिसरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा! हजारो रूपये वाचणार; १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू

MoRTH New Rules : पास केवळ वैयक्तिक बिगरव्यावसायिक वाहनांसाठी, सक्रिय FASTag असणे आणि त्याच टोल प्लाझावर वापरता येईल. पर्यायी/सेवा रस्ता उपलब्ध असेल किंवा बंदिस्त टोल प्रणाली असेल तर ही सुविधा लागू होणार नाही.
FASTag Annual Pass : टोल नाक्यापासून २० किमी परिसरात राहणाऱ्यांना मोठा दिलासा! हजारो रूपये वाचणार; १ नोव्हेंबरपासून नवा नियम लागू
Updated on: 

राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाक्यापासून 20 किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने स्थानिक खासगी वाहनधारकांसाठी सवलतीच्या दरात फास्टॅग वार्षिक पास उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) यासंदर्भात अधिसूचना जारी केली असून, १ नोव्हेंबर २०२६ पासून ही सुविधा लागू होणार आहे. नव्या नियमानुसार पात्र वाहनधारकांना वर्षभरासाठी १,५०० किंवा ३००० रुपयांत वार्षिक पास घेता येणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com