डॉ. दिलीप सातभाई- चार्टर्ड अकाउंटंट- सीए कें द्र सरकारने कलम ४६ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून, सात एप्रिल २०२५ पासून परकी योगदान प्राप्त करण्यासाठी आणि वापरण्यासाठी वैधता कालावधी निश्चित केला आहे. .नवे बदलपरकी योगदान प्राप्त करण्यासाठी वैधता कालावधी पूर्वपरवानगी अर्जाच्या मंजुरीच्या तारखेपासून तीन वर्षे असेल, तर ते योगदान वापरण्यासाठी वैधता कालावधी पूर्वपरवानगी अर्जाच्या मंजुरीच्या तारखेपासून चार वर्षे असेल. याखेरीज ज्या पूर्वपरवानगी अर्जांना आधीच मान्यता देण्यात आली आहे आणि जेथे पूर्वपरवानगीमध्ये मंजूर प्रकल्प/कार्यक्रमाचा उर्वरित कालावधी तीन वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा अर्जाच्या मंजुरीच्या तारखेऐवजी वरील कालावधी हा आदेश जारी केल्याच्या तारखेपासून मोजला जाईल. वरील वेळेच्या मर्यादेपलीकडे येणारी परकी योगदानाची कोणतीही जमा रक्कम किंवा तिचा वापर हे आता कायद्याचे उल्लंघन मानण्यात येईल, जे दंडात्मक कारवाईस पात्र असेल..याखेरीज गृहमंत्रालयाने २६ मे २०२५ रोजीच्या अधिसूचनेद्वारे परकी योगदान (नियमन) नियम, २०११ मध्ये बदल केले आहेत. हे बदल या कायद्याअंतर्गत होणारी नोंदणी (फॉर्म एफसी-३ए), पूर्वपरवानगी, (फॉर्म एफसी-३बी) नूतनीकरण (फॉर्म एफसी-३सी) आणि वार्षिक अहवाल (फॉर्म एफसी-३डी) सादर करण्यासाठी अधिक माहितीच्या अतिरिक्त प्रकटीकरणाशी संबंधित आहेत. यामुळे सनदी लेखापालांची अनुपालनाची जबाबदारी वाढणार असून नोंदणीचे निकषही कठोर करण्यात आले आहेत..पूर्वपरवानगी मागणाऱ्या अर्जदाराला खालील कागदपत्रे नव्याने जोडावी लागणार आहेत.देणगीदाराने खात्रीने देणगी देण्याचे कबूल केलेल्या पत्रातील रक्कम, देणगी स्वीकारण्यासाठी पूर्वपरवानगी मागितलेल्या फॉर्ममध्ये नमूद केलेल्या देणगीच्या रकमेशी जुळणारी पाहिजे.मिळणाऱ्या योगदानातून ज्या प्रकल्पासाठी खर्च प्रस्तावित केला आहे त्याची सविस्तर यादी व हा खर्च परदेशी योगदानाच्या २० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल, अशी घोषणा समाविष्ट करणे आवश्यक आहे.संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्याबरहुकूम मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे पत्र; ज्यात मंत्रालयाने जारी केलेल्या पूर्वपरवानगीसाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रत्येक बाबीबाबत मुद्देनिहाय तपशील समाविष्ट करायला हवा.गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्यात आर्थिक कृतीदलाच्या (FATF) मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, याची ग्वाही देणे बंधनकारक आहे..अतिरिक्त नोंदणी नियमगेल्या तीन आर्थिक वर्षांचे ताळेबंद, जमा आणि नावे पत्रक आणि उत्पन्न आणि खर्च पत्रक आणि लेखापरीक्षण अहवाल सादर करावा लागेल. अर्जातील खर्च भिन्न असल्यास गृहमंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्यात सीएचे प्रमाणपत्र, जोडावे लागेल.गेल्या तीन वर्षांचे वर्षनिहाय उद्दिष्टपूर्ती कार्याचा अहवालनमूद केलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ‘एए’ या नमुन्यात प्रतिज्ञापत्रअसोसिएशन प्रकाशन संबंधित कामात असेल कायद्याचे पालन करण्याबाबत हमीपत्र सादर करावे.Silver Investment : चमकदार चांदी अन् गुंतवणूक संधी.असोसिएशनचे प्रकाशन रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडियाकडे नोंदणीकृत असेल, तर रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर फॉर इंडियाकडून ‘नॉट अ न्यूजपेपर’ प्रमाणपत्र सादर करावे लागेलनोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपल्यानंतर किंवा रद्द झाल्यानंतर परकी योगदानाची पावती आणि वापर याबद्दलचे शपथपत्र सादर करावे लागेल. बँक खात्याची प्रमाणित प्रत द्यावी लागेल.गेल्या तीन आर्थिक वर्षांत उद्दिष्टांवरील खर्च १५ लाखांपेक्षा कमी असेल, तर भांडवली गुंतवणुकीचा समावेश करण्याबाबतचे शपथपत्र विहित नमुन्यात सादर करावे लागेल..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.