
OLA CEO Bhavish Aggarwal
Sakal
OLA CEO Bhavish Aggarwal: बेंगळुरूमध्ये ओला (Ola) कंपनीच्या एका कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर कंपनीचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल तसेच वरिष्ठ अधिकारी सुब्रत कुमार दास यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत कर्मचारी अरविंद (वय 38) यांनी 28 पानांची नोट लिहिली असून त्यात त्यांनी कामाच्या ठिकाणी होणाऱ्या त्रासाबद्दल गंभीर आरोप केले आहेत.