Force Motors : फोर्स मोटर्स लिमिटेड देत आहे 20 रुपये डिव्हिडेंड, एका वर्षात 638% परतावा...

फोर्स मोटर्स लिमिटेडने (Force Motors) नुकताच डिव्हिडेंड जाहीर केला आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना 200 टक्के डिव्हिडेंड देणार आहे.
Force Motors
Force Motors Sakal

फोर्स मोटर्स लिमिटेडने (Force Motors) नुकताच डिव्हिडेंड जाहीर केला आहे. कंपनी आपल्या शेअरहोल्डर्सना 200 टक्के डिव्हिडेंड देणार आहे. कंपनीच्या शेअरहोल्डर्सना प्रत्येक शेअरवर 20 रुपये डिव्हिडेंड दिला जाईल.

कंपनीच्या संचालक मंडळाने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 10 रुपयांच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 20 रुपये डिव्हिडेंड देण्याची शिफारस केल्याचे कंपनीने सांगितले. दरम्यान, फोर्स मोटर्सचे शेअर्स नुकतेच सुमारे 3 टक्क्यांनी घसरले असून शेअर 9584.60 रुपयांवर बंद झाले.

फोर्स मोटर्स लिमिटेडने 23 सप्टेंबर 2003 पासून आतापर्यंत 16 वेळा डिव्हिडेंड जाहीर केला आहे. गेल्या 12 महिन्यांत कंपनीने प्रति शेअर 10 रुपये डिव्हिडेंड जाहीर केला आहे. सध्याच्या किमतीवर, फोर्स मोटर्सचे डिव्हिडेंड यील्ड 0.10 टक्के आहे. कंपनीने यापूर्वी सप्टेंबर 2023 मध्ये 10 रुपयांचा डिव्हिडेंडही जारी केला होता. त्याच वेळी, सप्टेंबर 2022 मध्ये 10 रुपये आणि सप्टेंबर 2021 मध्ये 5 रुपये डिव्हिडेंड जारी करण्यात आला होता.

फोर्स मोटर्सचा नेट प्रॉफिट वार्षिक 4.3 टक्क्यांनी घसरून आर्थिक वर्ष 2024 च्या चौथ्या तिमाहीत 140.3 कोटी झाला. कंपनीने नियामक फायलिंगमध्ये म्हटले आहे की गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने 146.6 कोटीचा नफा कमावला होता. याच कालावधीत EBITDA 278.7 कोटी होता, जो गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 120.8 कोटी होता. या तिमाहीत EBITDA मार्जिन 13.9 टक्के आहे, जे गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 8.1% होते.

फोर्स मोटर्सचे मार्केट कॅप 12491 कोटी आहे. स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 10,245.65 रुपये आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 1291.90 रुपये आहे. गेल्या एका महिन्यात कंपनीच्या शेअर्समध्ये 33 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

त्याच वेळी, स्टॉकने गेल्या 6 महिन्यांत 171 टक्के मजबूत परतावा दिला आहे. या वर्षात कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 160 टक्क्यांनी घसरले आहेत. इतकेच नाही तर गेल्या एका वर्षात गुंतवणूकदारांना 638 टक्के बंपर नफा मिळाला आहे.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com