
Veeba Company Work Hour: एकीकडे आठवड्यातून 70 आणि 90 तास काम करण्याची चर्चा सुरु असताना दुसरीकडे एका कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांची मने जिंकली आहेत. वीबा कंपनीचे संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक विराज बहल यांनी जास्त तास काम करणे हे कर्मचाऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे. यासोबतच त्यांनी त्यांच्या कंपनीतील कामाचे तास 40 पर्यंत कमी केले आहेत. वीबा ही सॉस बनवणारी कंपनी आहे.