Form No 16 : IT Returns साठी महत्त्वाचा असलेला फॉर्म 16 डाऊनलोड कसा करायचा? जाणून घ्या

फॉर्म 16, 16A आणि 27D काय आहे?
Form No 16
Form No 16 esakal

Form No 16 :

एखाद्या व्यक्तीचे आर्थिक उप्तन्न 5 लाखांच्या वर असेल तर त्याला Income Tax भरावा लागतो. चालू आर्थिक वर्षात Tax भरण्यासाठीची अंतिम मुदत 15 जून आहे. त्यामुळे  कंपनी कर्मचाऱ्यांचा गोंधळ उडाला आहे. Income Tax भरण्यासाठी Form 16 ची आवश्यकता असते. या फॉर्मशिवाय तुम्ही कर भरू शकत नाही.  

तुम्ही देखील ITR भरणार असाल आणि तुमच्याकडे फॉर्म 16 नसेल किंवा तुम्हाला फॉर्म 16A आणि 27D ची गरज असेल, तर तुम्ही तो सहज मिळवू शकता. नियोक्ते किंवा कंपन्या अनेकदा 16 मे च्या शेवटी किंवा 15 जूनपूर्वी फॉर्म जारी करतात. तुम्हाला स्वत:ला हा फॉर्म डाऊनलोड करता येतो. अगदी सोप्या स्टेप्सनी हा फॉर्म कसा डाऊनलोड करायचा हे पाहुयात. (Income Tax Returns)

Form No 16
Fake Income Tax Officer: परीक्षा पास झाला नाही अन् घरी सांगितलं आयकर अधिकारी झालो, गाडीवरही लावली नेमप्लेट; असं फुटलं बिंग

फॉर्म 16, 16A आणि 27D काय आहे?

फॉर्म 16 हा एक महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. कारण, ज्यामध्ये आयकर रिटर्न सबमिट करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील दिलेले असतात. दरवर्षी आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर नियोक्त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा फॉर्म देणे बंधनकारक आहे. नियोक्ते सहसा त्यांच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या मध्यापूर्वी फॉर्म 16 प्रदान करतात.

फॉर्म 16A मध्ये कपात केलेल्या TDS आणि करदात्याची PAN आणि TAN चे त्रैमासिक विवरण आणि इतर माहिती समाविष्ट असते. 27D हा एक फॉर्म आहे जो तीन महिन्यांची डिटेल्स देतो. ज्यात करदात्याने टॅक्स भरला आहे की नाही याची माहिती असते. त्यामुळेच Tax भरण्यासाठी या कागदपत्राची आवश्यकता असते.

Form No 16
Income Tax Return: इन्कम टॅक्स रिटर्न भरलाय पण रिफंड मिळालेला नाही? असा तपासा ऑनलाईन स्टेटस

करदाता सरकारला कर भरला आहे की नाही हे ते सांगते. यामुळे आयटीआर भरताना ही कागदपत्रे आवश्यक आहेत.

Form 16 हा एक दस्तऐवज आहे, ज्यामध्ये आयकर रिटर्न सबमिट करण्यासाठी आवश्यक असलेले सर्व तपशील आहेत. प्रत्येक आर्थिक वर्ष पूर्ण झाल्यावर नियोक्त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना हा फॉर्म देणे बंधनकारक आहे. नियोक्ते सहसा त्यांच्या कर्मचाऱ्यांना मे  महिन्याच्या शेवटी किंवा जूनच्या मध्यापूर्वी फॉर्म 16 प्रदान करतात.

Form No 16
Income Tax Returns : सूचनापत्रक महत्त्वाचे

कंपनी कर्मचाऱ्याच्या ज्या आर्थिक वर्षात Tax कापला जातो. त्याच्या पुढच्या जून महिन्यातील 15 तारखेला नियोक्त्याकडून Form 16 घेऊ शकतो. Form 16 TRACES वेबसाइटवरून डाउनलोड केला जाऊ शकतो. पण तो पूर्ण स्वरूपात येत नाही. TRACES म्हणजे TDS रिकन्सिलिएशन ॲनालिसिस आणि इम्प्रूव्हमेंट एनेबलमेंट सिस्टम होय.

Form 16 कसा डाऊनलोड कराल?

  • Traces वेबसाइट www.tdscpc.gov.in/en/home.html वर जा.

  • आता 'लॉगिन' विभागात जा आणि ड्रॉपडाउन मेनू 3 मधून 'Tax Payer' निवडा.

  • User ID, Password आणि पॅनसह लॉग इन करा.

  • टॅक्स क्रेडिट पहा किंवा Verify करा आणि सेक्शनमध्ये इंटर करा

  • तात्पुरते TDS प्रमाणपत्र 16/16A/27D निवडा.

  • पुढील पेजवर तुम्हाला Tax संदर्भातील आर्थिक वर्ष, नियोक्त्याचे टॅन, तिमाही अशी माहिती भरावी लागेल.

  • 'प्रोव्हिजनल सर्टिफिकेट टाईप' च्या ड्रॉपडाउन अंतर्गत, फॉर्म 16, 16A, 27D या ऑप्शन्समधून Download करण्याचा ऑप्शन निवडा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com