

नवी दिल्ली, ता. २८ ः चालू आर्थिक वर्षात ऑक्टोबर-डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत भारताचा एकूण देशांतर्गत उत्पादनवाढीचा (जीडीपी) दर ६.२ टक्के नोंदवला गेला आहे. दुसऱ्या तिमाहीतील ५.४ टक्के दराच्या तुलनेत विकासदरात सुधारणा झाली आहे. दुसऱ्या तिमाहीतील विकासदर सात तिमाहीतील सर्वांत कमी होता. आर्थिक वर्ष २०२५ साठी ‘जीडीपी’ दराचा अंदाज ६.४ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) आज ही आकडेवारी जाहीर केली.