Gold Rate Today: गुढीपाडव्याआधी सोन्याने गाठला उच्चांक; भावात आणखी वाढ होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Gold-Silver Rate Today 4 April 2024: जागतिक बाजारपेठेत सोने, चांदी या मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेतही सोन्याच्या भावाने आज नवा उच्चांक गाठला. चांदीचा भावही प्रतिकिलो १७०० रुपयांनी वाढून ८० हजार ७०० रुपये प्रतिकिलो झाला आहे.
Gold-Silver Rate Today 4 April 2024
Gold-Silver Rate Today 4 April 2024Sakal

Gold-Silver Rate Today 4 April 2024: जागतिक बाजारपेठेत सोने, चांदी या मौल्यवान धातूंच्या भावात वाढ झाल्याने देशांतर्गत बाजारपेठेतही सोन्याच्या भावाने आज नवा उच्चांक गाठला. नवी दिल्लीतील बाजारपेठेत सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅममागे 830 रुपयांनी वाढून 69 हजार 200 रुपयांवर पोहोचल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.

चांदीचा भावही प्रतिकिलो 1,700 रुपयांनी वाढून 80 हजार 700 रुपये प्रतिकिलो झाला आहे. पुणे बाजारपेठेत आज शुद्ध सोन्याचा भाव 69 हजार 300 रुपयांवर गेला. या आठवड्यात सोन्याच्या भावाने सार्वकालिक उच्चांक गाठण्याची ही दुसरी वेळ आहे. मागील व्यवहारात सोन्याचा भाव प्रतिदहा ग्रॅमसाठी 68 हजार 370 रुपयांवर बंद झाला होता.

परदेशी बाजारात तेजीचा कल असल्याने आज दिल्लीच्या बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव आज प्रतिदहा ग्रॅमसाठी 69 हजार 200 रुपयांवर गेला. आंतरराष्ट्रीय बाजारात कॉमेक्सवर स्पॉट गोल्ड मागील बंदच्या तुलनेत प्रति औंस 20 डॉलरने वाढून 2275 डॉलरवर व्यवहार करत होते.

सुरुवातीच्या सत्रात सोन्याचा भाव प्रति औंस 2,300 डॉलरच्या पुढे गेल्याने सोन्याने एक नवा सार्वकालिक उच्चांक गाठला. एमसीएक्सवर वायदे व्यवहारात सोन्याचा भाव 69,500 रुपयांपर्यंत वाढला. आखाती देशांमध्ये तणाव वाढत असल्याने सोन्याची मागणी वाढतच आहे. त्यामुळे भाववाढीला चालना मिळाली आहे, असे एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी सांगितले.

सोन्याची शुद्धता कशी ओळखायची:

सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं.

बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.(How to determine purity of gold

Gold-Silver Rate Today 4 April 2024
Richest List: भारतात यावर्षी 25 नवीन अब्जाधीशांची भर; अंबानी भारतात टॉपवर, अदानी कोणत्या स्थानी?

हॉलमार्क (Hallmark):

सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. हॉलमार्क चिन्ह पाहिल्यानंतरच खरेदी करावी.

सोन्याची सरकारी हमी असते, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Gold-Silver Rate Today 4 April 2024
RBI Guidelines: EMI भरणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा! कर्जाशी संबंधित नवीन नियम 1 एप्रिलपासून लागू

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात. ( What is the difference between 22 and 24 carats? )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com