
दिल्लीमध्ये सोने 1,400 रुपयांनी घसरून 99,620 रुपये प्रति 10 ग्रॅमवर, तर चांदी 3,000 रुपयांनी घसरून 1,15,000 रुपये प्रति किलोवर आली आहे.
अमेरिका आणि तिच्या व्यापारी भागीदारांमधील करारांमुळे सोन्या-चांदीची मागणी कमी, गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेच्या टॅरिफ करारांमुळे जोखीम कमी झाली आहे.
Gold Silver Price: सोन्या आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली. सोने पुन्हा एकदा एक लाख रुपयांच्या खाली आले आहे, तर चांदीचे भावही विक्रमी पातळीवरून खाली घसरले आहेत. गुंतवणूकदारांचा कल सोन्या-चांदीकडून इतर बाजारांकडे वळताना दिसतोय. अमेरिकेचा जपान आणि फिलिपिन्ससोबत झालेल्या व्यापार करारांमुळे जागतिक टॅरिफ तणाव कमी झाला आहे. याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी सोन्या-चांदीत प्रॉफिट बुकिंग सुरू केले आहे.