

Gold Loan Boom: After Tata, Birla Enters the Gold Loan Business! Why Is Demand Rising?
eSakal
Gold Loan Craze in India: भारतात सोनं गहाण म्हणजेच तारण ठेवून कर्ज घेण्याचे प्रमाण सध्याच्या काळात झपाट्याने वाढत आहे. या विस्तारात चाललेल्या बाजारपेठेत आता देशातील मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांना येताना दिसत आहे. आदित्य बिर्ला समूहाने गोल्ड लोन व्यवसायात उतरण्याची घोषणा केली असून, देशभरात 1,000 हून अधिक शाखा सुरू करण्याची योजना आखली आहे.
यापूर्वी टाटा कॅपिटलने Yogloans, तर गोदरेज कॅपिटलने Kanakadurga Finance च्या माध्यमातून गोल्ड लोनच्या व्यवसायात एंट्री केली आहे. त्यामुळे पारंपरिकपणे काही मोजक्या गोल्ड लोन कंपन्यांचे वर्चस्व असलेल्या या क्षेत्रात आता मोठ्या कॉर्पोरेट समूहांची स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे.