Gold At Record High: सोन्याच्या भावाने मोडले सर्व रेकॉर्ड, सोने सर्वकालीन उच्चांकावर

Gold At Record High: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव मे महिन्यानंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत.
Gold nears record level in India, at 6-month high globally
Gold nears record level in India, at 6-month high globally Sakal

Gold At Record High: सलग चौथ्या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव मे महिन्यानंतरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचले आहेत. जगभरात सध्या सुरू असलेला तणाव आणि चलनवाढीच्या चिंतेमुळे सोन्याची मागणी वाढण्याची अपेक्षा आहे.

त्यामुळे मौल्यवान धातूच्या किंमतीत वाढ होणार असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. आज सोन्याचा भाव 62883 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे, जो आजपर्यंतचा उच्चांक आहे.

तज्ज्ञांचे काय मत आहे?

बाजारातील तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की सोन्याचे भाव भविष्यात वाढतच राहतील आणि केडिया अॅडव्हायझरीच्या अहवालानुसार, असे अनेक घटक आहेत जे 2024 मध्ये सोन्याची वाढ कायम ठेवू शकतात.

अलीकडच्या काळात सोन्यातील गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाल्याचे अहवालात म्हटले आहे. गेल्या वर्षभरात देशांतर्गत बाजारात सोन्याच्या भावात 18 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे, तर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या भावात 16 टक्क्यांची वाढ झाली आहे.

Gold nears record level in India, at 6-month high globally
PhonePe Loans: नवीन वर्षात फोन-पे देणार पर्सनल लोन सुविधा; अनेक बँकांशी हातमिळवणी

महागाई उच्च पातळीवर राहण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने सोने वाढण्याची शक्यता आहे. केडिया अॅडव्हायझरीच्या अहवालानुसार, महागाई जसजशी वाढत जाते तसतशी सोन्याची मागणीही वाढते हे वारंवार दिसून येत आहे.

Gold nears record level in India, at 6-month high globally
Charlie Munger Passes Away: वॉरेन बफे यांचे विश्वासू सल्लागार चार्ली मुंगेर यांनी वयाच्या 99 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

याशिवाय जगभरातील वाढत्या भौगोलिक-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किंमतीवर दबाव येऊ शकतो. रॉयटर्सच्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की जगभरात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, सोन्याच्या भावातील वाढीचा कल पुढील वर्षीही कायम राहू शकतो.

त्याचबरोबर मध्यवर्ती बँकांकडून सोन्याच्या खरेदीत वाढ झाल्यानेही सोन्याच्या मागणीत वाढ होऊ शकते. या वर्षी ऑगस्टमध्ये केंद्रीय बँकांच्या सोन्याच्या साठ्यात 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com