
Gold Price Prediction: गेल्या काही वर्षांत जगभरात सोन्याची मागणी झपाट्याने वाढली आहे. सध्या सोन्याच्या भावाने विक्रमी पातळी गाठली आहे. आता एका मोठ्या सोन्याच्या खाण कंपनीने दावा केला आहे की, येत्या काळात सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांपर्यंत घसरू शकते. याचा अर्थ सोने 27,000 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. कझाकस्तानमधील आघाडीची सोन्याची खाण कंपनी सॉलिडकोर रिसोर्सेस पीएलसीच्या सीईओंनी दावा केला आहे की, पुढील 12 महिन्यांत सोन्याच्या किमतीत मोठी घसरण होऊ शकते.