Gold-Silver Rate Sakal
Personal Finance
Gold-Silver Rate : सोन्याच्या भावात जूनअखेर पुन्हा वाढ, चांदीही स्थिरतेकडून वाढीकडे; तणाव, डॉलरची किंमत, बँक धोरणाचा परिणाम
Jewellery Market : गेल्या तीन महिन्यांत सोन्या-चांदीच्या दरात मोठ्या चढ-उतारांची नोंद; जुलैच्या सुरुवातीस सोने ९० हजारांवर स्थिर.
पुणे : सोने आणि चांदीच्या भावात गेल्या तीन महिन्यांत लक्षणीय चढ-उतार झाले आहेत. गेल्या महिन्यात एक लाखाचा टप्पा पार केलेले सोने आता पुन्हा ९८ हजार रुपयांच्या घरात आहे. जागतिक आर्थिक परिस्थिती, डॉलरची किंमत, पश्चिम आशियातील तणाव, मध्यवर्ती बँकांचे धोरण यांचा थेट परिणाम मौल्यवान धातूंच्या भावावर झाला आहे. सोन्याच्या भावात एप्रिलमध्ये थोडी घसरण झाली असली तरी, जूनच्या अखेरीस भाव पुन्हा तेजीत आले. चांदीच्या भावाने मात्र स्थिरपणानंतर थेट वाढीचा टप्पा गाठला आहे.