
Gold Price: सोन्याच्या किमती आता शिखरावर पोहोचल्या आहेत आणि पुढील दोन महिन्यांत त्यात 12 ते 15 टक्क्यांची घट होऊ शकते. हा अंदाज क्वांट म्युच्युअल फंडने वर्तवला आहे. सध्याच्या परिस्थितीकडे पाहिले तर किरकोळ बाजारात सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 96,960 रुपये होता. जीएसटी जोडल्यानंतर तो 99,868 वर पोहोचला. परंतु विश्लेषकांच्या मते, येत्या आठवड्यात या किमती खूपच कमी होऊ शकतात.