
Gold Rate Today
Sakal
Summary
गेल्या काही वर्षांत सोन्याचे भाव जवळपास दुप्पट वाढले आहेत.
२०२५ मध्येच सोन्याच्या भावात ५१% पेक्षा जास्त वाढ झाली आहे.
ग्राहकांना हॉलमार्क तपासूनच सोने खरेदी करण्याचा सल्ला BIS कडून देण्यात आला आहे.
देशभरात सोने आणि चांदीचे भाव वाढतच आहेत.सोन्याने पुन्हा एकदा एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १,२६,७१४ रुपये झाला. चांदीचे भाव प्रति किलोग्रॅम १,७४,००० रुपये झाला. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव प्रति १० ग्रॅम १,३१,८०० रुपयांच्या आतापर्यंतच्या उच्चांकावर पोहोचले.चांदीचे भाव त्यांच्या विक्रमी उच्चांकावरून ३,००० रुपयांनी घसरून प्रति किलोग्रॅम १,८२,००० रुपयांवर पोहोचले (सर्व करांसह). IBJA नुसार, २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव जाणून घेऊया.