
बुधवार, 30 जुलै 2025 रोजी सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी धोरणांवरील अपडेट्स आणि भारतीय रुपयाच्या अवमूल्यनामुळे सोन्याची चमक वाढली आहे. आज सकाळच्या व्यवहारात सोन्याच्या किंमतीत 600 रुपयांची वाढ झाली, तर चांदी 1,15,900 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांचे लक्ष आता ट्रम्प यांनी ठरवलेल्या 1 ऑगस्टच्या टॅरिफ मुदतीकडे लागले आहे.