

Gold Rate Today
esakal
Gold and silver prices today: नवीन आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशभरात सोन्याच्या भाव घसरले आहेत. ५ जानेवारी रोजी सकाळी राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १३५,९६० रुपयांवर आला. मुंबईत हा भाव प्रति १० ग्रॅम १३५,८१० रुपयांवर आला आहे. एका आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा भाव ७५० रुपयांनी वाढला आहे. दरम्यान, २२ कॅरेट सोन्याच्या भावात ७६० रुपयांची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची स्पॉट किंमत प्रति औंस ४,३९२.९४ डॉलर आहे. देशभरातील काही प्रमुख शहरांमधील सोन्याचे भाव काय आहेत हे जाणून घेऊया.