
Gold Price Today: सोने आणि चांदीचे भाव सतत वाढत आहेत. सोने आणि चांदीने पुन्हा एकदा नवा इतिहास रचला. वायदा बाजारात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १.१० लाख रुपयांवर पोहोचला आहे. ऑल इंडिया सराफा असोसिएशनच्या मते, दिल्लीच्या बाजारात सोन्याचा भाव ५०८० रुपयांनी वाढून १ लाख १२ हजारांवर पोहोचला आहे. दुसरीकडे, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १०९४७५ रुपये झाला आहे, तर चांदीचा भाव प्रति किलो १२४७७० रुपये झाला आहे. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे नवीन भाव काय आहेत हे जाणून घेऊया.