
थोडक्यात:
देशातील बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे दर जवळपास स्थिर राहिले, 24 कॅरेट सोन्यात फक्त 70 रुपयांची किरकोळ वाढ झाली.
अमेरिका-चीन तणाव कमी होणे, डॉलर इंडेक्समध्ये तेजी आणि गुंतवणूकदारांच्या विक्रीमुळे सोन्याच्या भावावर दबाव आहे.
भारतामध्ये सोन्याचे दर आंतरराष्ट्रीय किंमती, आयात शुल्क, रुपया-डॉलर दर आणि मागणी-पुरवठ्यावर ठरतात.
Gold Rate Today: सोन्याच्या भावामध्ये घसरणीचा कल कायम राहिला आहे. देशातील बुलियन मार्केटमध्ये आज, शुक्रवारी 18 जुलै रोजी, सोन्याचे भाव जवळपास स्थिरच दिसत आहेत. दिल्लीमध्ये 22 कॅरेट सोनं कालच्या दरावरच व्यवहारात आहे, तर 24 कॅरेट सोन्यात फक्त 70 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. एक किलो चांदीचा भाव 1,13,900 रुपयांवर स्थिर राहिला आहे.