
थोडक्यात:
आज 24 कॅरेट सोनं 1,00,000 रुपयांच्या वर पोहोचलं, तर 22 कॅरेट सोनं 91,800 च्या वर आहे.
जागतिक तणाव, रशियावरचे निर्बंध आणि डॉलरच्या घसरणीमुळे सोन्याच्या भावात वाढ झाली आहे.
चांदीच्या भावात कोणताही बदल नाही, चांदीचे भाव 1,16,000 रुपये किलोवर स्थिर आहेत.
Gold Rate Today: आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी देशभरातील बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या भावात किरकोळ वाढ झाली आहे. आज सोन्याचा भाव 100 रुपयांनी वाढला असून, 24 कॅरेट सोनं 1,00,000 रुपयांच्या वर व्यवहार करत आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 91,800 रुपयांच्या वर पोहचला आहे. चांदीच्या भावात मात्र बदल झाला नाही आणि भाव 1,16,000 रुपये किलोवर स्थिर आहे.