
Gold Rate Today: आज सोमवार, 7 जुलै 2025 रोजी देशभरात सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या भावाच्या तुलनेत आज 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल 550 रुपयांनी खाली घसरला आहे, तर 22 कॅरेट सोन्याच्या भावात 500 रुपयांची घट झाली आहे.
दागिणे बनवण्यासाठी वापरले जाणारे 22 कॅरेट सोने आज 90,100 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास आहे, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 98,200 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या वर आहे.