
Gold Silver Price Today: अमेरिका आणि चीनमधील व्यापार कराराच्या बातमीमुळे सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. दिल्ली सराफ बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 3,400 रुपयांनी स्वस्त झाले. यानंतर सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 96,550 रुपये झाली. चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर कर वाढवण्याचा निर्णय अमेरिकेने 90 दिवसांसाठी पुढे ढकलल्यामुळे व्यापाऱ्यांनी सोन्यात गुंतवणूक करण्याऐवजी इतर गोष्टींमध्ये पैसे गुंतवण्यास सुरुवात केली. त्यामुळे सोन्याची मागणी कमी झाली.