
Gold Prices Today: भारतामध्ये सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा घसरण झाली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिका-चीनमधील व्यापार तणाव कमी झाला आहे. तसेच जागतिक बाजारात डॉलर कमकुवत झाला आहे. 30 जून 2025 रोजीच्या व्यवहारात देशभरात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या भावात घसरण झाली आहे. एप्रिल महिन्यात 24 कॅरेट सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाखाचा ऐतिहासिक टप्पा पार केला होता. मात्र त्यानंतर किंमतीत चढ-उतार पाहायला मिळाले. सध्या भाव पुन्हा खाली आले आहेत.