
सोन्याच्या भावात 2025 मध्ये मोठी वाढ आली असून 10 ग्रॅम सोन्याचा भाव तब्बल ₹5,800 ने वाढला आहे.
ही वाढ जागतिक बाजारातील अस्थिरता, डॉलरची घसरण आणि गुंतवणूकदारांचा वाढलेला कल यामुळे झाली आहे.
सध्याच्या वाढीनंतर सोन्याने पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठला आहे.
10 Grams Gold Price: दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव पुन्हा एकदा वाढले आहेत. 99.9% शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज तब्बल 800 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,03,420 रुपयांवर पोहोचला. गुरुवारीच सोन्याने 3,600 रुपयांची मोठी वाढ घेतली होती. म्हणजेच गेल्या पाच व्यापार सत्रांत सोन्याचा भाव एकूण 5,800 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. 99.5% शुद्धतेच्या सोन्याची किंमतही 1,03,000 रुपयांच्या आसपास आहे.