
Gold Price Today in India
Sakal
Gold Rate Today in India: आज म्हणजेच 10 ऑक्टोबर रोजी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा जोरदार वाढ झाली आहे. सलग पाचव्या दिवशी सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. आज राजधानी दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ₹ 1,24,310 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. देशातील इतर शहरांमध्येही भाव वाढले असून दिवाळी आणि धनत्रयोदशीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढत असल्याचं दिसतंय.