Gold Rate Today: लग्नसराईपूर्वी सोन्याचे भाव कोसळले! 40 मिनिटांतच मोठी घसरण; 11 महिन्यांतील सर्वात स्वस्त भाव; तुमच्या शहरातील दर पाहा

Today 22 caret Gold Price Mumbai: लग्नसराईच्या काळात सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजच्या बाजारातील घसरण तुमच्यासाठी महत्त्वाची ठरू शकते. अवघ्या 40 मिनिटांत सोनं 3 हजारांनी, तर चांदी 6 हजारांनी स्वस्त झाली असून पुणे, मुंबईसह महाराष्ट्रातील आजचे दर किती आहेत ते जाणून घ्या.
Gold Rate Today: Gold Prices Crash by ₹3,000 in Just 40 Minutes; Lowest Level in 11 Months

Gold Rate Today: Gold Prices Crash by ₹3,000 in Just 40 Minutes; Lowest Level in 11 Months

eSakal

Updated on: 

Gold Silver Price Today: लग्नसराई सुरू होण्यापूर्वी सोन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी सध्या दिलासादायक बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात सुरू असलेली घसरण आजही कायम आहे. आज कमोडिटी बाजारात अवघ्या 40 मिनिटांत सोनं 3 हजार रुपयांनी स्वस्त झालं. सराफा बाजारातही सोन्याच्या दरात 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. तर आठवडाभरात सोनं तब्बल 13 हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. आजच्या घसरणीनंतर सोन्याचा भाव 11 डिसेंबर 2026 नंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. म्हणजेच गेल्या 11 महिन्यांतील सर्वात स्वस्त दरात आज सोन्याची विक्री होत आहे.

Loading content, please wait...