
पुढील आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. जागतिक आर्थिक घडामोडी, विशेषत: अमेरिकेचे आर्थिक आकडे, व्यापार चर्चा आणि मध्यवर्ती बँकांचे धोरणात्मक निर्णय यांचा सोन्याच्या किमतींवर परिणाम होण्याची अपेक्षा आहे. युरोपियन मध्यवर्ती बँकेच्या व्याजदरावरील निर्णयाकडेही गुंतवणूकदारांचे लक्ष असेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.