

Gold Prices Surge: Check Today’s 24K, 22K and 18K Gold Rates in Pune
esakal
स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी देशातील सोन्याच्या दरात मोठी तेजी पाहायला मिळाली. Goodreturns च्या माहितीनुसार 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. दोन दिवसांपूर्वी 24 कॅरेट सोन्याच्या 100 ग्रॅम दरात 12,600 रुपयांची आणि 10 ग्रॅम दरात 1,260 रुपयांची मोठी घसरण झाली होती. त्यानंतर सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात वाढ झाली असून, आठवड्याचा शेवट दोन महिन्यांतील उच्च पातळीवर झाला.