

"Latest gold and silver rates in India after GST revision – check today’s 24k, 22k, 18k and 14k gold prices."
esakal
१६ सप्टेंबर रोजी सोन्याचा भाव घसरून २४ कॅरेटचे सोने प्रति १० ग्रॅम १,०९,५११ वर आले असून चांदीचा भाव १,२७,७९१ रुपये प्रति किलो झाला.
IBJA ने २४K, २३K, २२K, १८K आणि १४K सोन्याचे वेगवेगळे ताजे भाव जाहीर केले आहेत.
सोने खरेदी करताना शुद्धता, मेकिंग चार्ज, वजन, बायबॅक पॉलिसी आणि विश्वसनीय दुकान यावर विशेष लक्ष द्यावे.
सोन्याचे भाव मागील काही दिवसांपासून सतत वाढत होते मात्र सोमवारी त्यात घसरण सुरु झाली. आज मंगळवार १६ सप्टेंबर रोजीी सोन्याच्या भावात बदल झाला आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA)च्या वेबसाइटनुसार, मंगळवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १०९५११ रुपयेतर चांदीचा किंमत प्रति किलो १२७७९१ रुपये झाला. पुढे, IBJA नुसार, २४ कॅरेट, २३ कॅरेट, २२ कॅरेट, १८ कॅरेट आणि १४ कॅरेट सोन्याचे ताजे भाव जाणून घेऊया.