

Gold Price Shock: 24K Gold Jumps ₹3,770 in a Day, Check latest Rate
eSakal
Gold Price Latest price Update Today: आज जुलै महिन्याच्या दुसऱ्याच दिवशी सोनं खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. जून महिन्यात सुरू झालेली सोन्याच्या भावातील घसरण जुलै महिन्यातही कायम राहील असे वाटत असताना आज मात्र या घसरणीला ब्रेक लागला. सकाळीच सराफा बाजारात 24 कॅरेट सोनं प्रति तोळा तब्बल 3,770 रुपयांनी महागलं असल्याने आता सर्वसामान्य ग्राहकांची चिंता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे आता सोनं खरेदी करण्याआधी आज तुमच्या शहरात काय दर आहे जाणून घ्या..