

Gold Prices Fall Ahead of Dussehra! Check Latest 24K, 22K Rates
Esakal
Check Today’s Latest Gold-Silver Rates: देशभरात सध्या सण-उत्सवांचा माहोल असून, येत्या काळात दसरा-दिवाळीचे सणही येणार आहेत. अशातच सोन्याच्या दरात घसरण झाल्याने खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ऑगस्ट महिन्यात मोठी वाढ झाल्यानंतर सप्टेंबरमध्ये सोनं स्वस्त होताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 3,300 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे तुम्हीही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आज सोनं किती रुपयांना विकलं जात आहे, जाणून घ्या.