

Gold Prices Change Again! Check Today’s Latest Gold Prices and Future Trend
eSakal
Gold Price Today: सध्या लग्नसराईच्या हंगामात मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र आता सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किमती वाढताना दिसत आहेत. अमेरिका-इराण बाबतच्या बातम्यांमुळे बाजारात सकारात्मक वातावरण तयार झाले असून त्याचा परिणाम सोन्याच्या दरांवर होत आहे. परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ होत असल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसत आहे.