दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शहरातील सराफ बाजारात सोने खरेदीची लगबग दिसून आली. परंपरेनुसार सोने घेणे मंगल मानले जाते. त्यामुळे काल (बुधवार) सकाळपासूनच सराफ दुकाने गजबजून गेली होती. गेल्या काही दिवसांत सोन्याचे भाव झपाट्याने वाढले आहेत..हलके दागिने, अंगठ्या व नाण्यांना पसंतीसध्या २२ कॅरेट सोने प्रतिदहा ग्रॅम एक लाख सात हजार ४५० रुपये, तर २४ कॅरेट सोने एक लाख १७ हजार ३०० रुपये (विना जीएसटी) आहे. जीएसटीसह १ लाख २१ हजार ५०० रुपये. वाढलेल्या भावांमुळे अनेकांनी मोठ्या खरेदीऐवजी हलके दागिने, अंगठ्या व नाण्यांना पसंती दिली..सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळण्याची प्रवृत्ती वाढली आहे. परिणामी, सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने वाढ होत आहे. २३ सप्टेंबरला सोने एक लाख १४ हजार ५०० रुपये प्रतिदहा ग्रॅम (विना जीएसटी) होते..Premium| Gold Investment: दसरा, दिवाळीसाठी सोनं घेताय? दागिन्यांना पर्याय आहे! वाचा सोन्यात गुंतवणूक करायचे प्रकार कोणते....पुण्यात सोन्याचा भाव किती?काल पुण्यात सोन्याचा भाव २४ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम ११,८६४ रुपये, २२ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम १०,८७५ रुपये आणि १८ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम ८,८९८ रुपये होता. तर नागपुरातही सोन्याचा भाव तसाच होता – २४ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम ११,८६४ रुपये, २२ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम १०,८७५ रुपये आणि १८ कॅरेटसाठी प्रति ग्रॅम ८,८९८ रुपये..सप्टेंबरमध्ये काय होता भाव?शनिवारी (ता. २७) सोन्याच्या भावात ३०० रुपयांची घट होऊन सोने एक लाख १४ हजार २०० रुपयांवर पोहोचले होते. २३ सप्टेंबरला चांदी एक लाख ३६ हजार रुपये प्रतिकिलो (विना जीएसटी) होती. शनिवारी (ता. २७) त्यात आठ हजारांची वाढ होऊन चांदी एक लाख ४४ हजारांवर पोहोचली होती..Gold-Silver Price Today: ऑक्टोबरच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे भाव वाढले; तुमच्या शहरातील भाव जाणून घ्या .सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.