Gold Rate Today: गौरी-गणपतीत सोन्याच्या भावात मोठी उलथापालट! 2 दिवसांत ₹30 हजार... मुंबई-पुण्यासह महाराष्ट्रात ताजा भाव काय?

Gold Price Today: गौरी-गणपतीच्या सणासुदीत सोन्याच्या भावात मोठी हालचाल झाली असून, अवघ्या 2 दिवसांत 100 ग्रॅम सोन्याच्या किमतीत ₹30 हजारांचा फरक पडला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि जळगावसह महाराष्ट्रातील 24, 22 आणि 18 कॅरेट सोन्यासह चांदीचा आजचा ताजा भाव जाणून घ्या.
Gold Rate Today

Gold Sees a Big Move During Gauri-Ganpati! ₹30,000 Difference in 2 Days, Check Maharashtra Rates

eSakal

Updated on

24K, 22K & 18K Gold And Silver Rates Across Maharashtra: देशभरात सध्या गौरी-गणपतीकहा सण सुरू असून आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याच्या भावात मोठी वाढ झाली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर वाढीच्या निर्णयानंतर सोन्याच्या बाजारात ही मोठी तेजी दिसून येत आहे. सध्या सराफा बाजारातही सोन्याची मागणी जास्त असल्याने सोनं महागलं असल्याचे सांगितले जात आहे. आजच्या घसरणीनंतर सोनं किती रुपयांना विकलं जात आहे पाहा..

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com