

Gold Price Today in India: Massive Surge Pushes Gold Past ₹1.5 Lakh
eSakal
Today Gold Rate : जागतिक बाजारात अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने आणि ग्रीनलँड संघर्षावरून वाढलेल्या तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. त्यामुळे सोनं-चांदीने आपले ऐतिहासिक टप्पे पार केले असून सर्वसामान्यांच्या चिंता वाढविल्या आहेत.
Goodreturns च्या आकडेवारीनुसार, आज दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ५,०४० रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम रुपये १,५४,९५० झाला आहे, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४२,०५० रुपये झाला आहे. त्यासोबतच महाराष्ट्रातही सोन्याचा भाव एवढा ५,०२० रुपयांनी वाढला आहे.