

Gold Prices Surge Before Akshaya Tritiya! Check Today’s Rates in Your City
eSakal
Gold Price Today: भारतात सोनं हे केवळ गुंतवणूक नसून त्याला एक सांस्कृतिक महत्त्व देखील आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया हा सोनं खरेदीसाठी अत्यंत शुभ मानला जातो. यंदा हा सण अवघ्या काही दिवसांवर आल्याने ग्राहकांमध्ये सोन्याच्या दरांविषयी उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, अमेरिका-इराण तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींमध्ये चढ-उतार पाहायला मिळाले. मात्र आता अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर सलग दुसऱ्या दिवशी वाढले आहेत. त्यामुळे आता सर्वसामान्य ग्राहकांची चिंता वाढली आहे. चला जाणून घेऊयात आजचे सोनं-चांदीचे ताजे भाव...