Gold Rate Today: अचानक स्वस्त झालं सोने, पण चांदीने तोडले सर्व रेकॉर्ड; आजचे नवे दर पाहिलेत का?

Gold Prices Slip Marginally While Silver Gains Amid Global Market Tension : देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर किरकोळ घसरले असतानाच भू-राजकीय तणाव आणि जागतिक तेजीच्या पार्श्वभूमीवर चांदीच्या किमतीत प्रति किलो १०० रुपयांची वाढ; प्रमुख शहरांतील दरांत सौम्य चढउतार
Gold Rate Today

Gold Rate Today

esakal

Updated on

आज शनिवार, ९ मे रोजी सकाळच्या व्यवहारात देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याच्या दरात थोडीशी घसरण नोंदवली गेली. मात्र, भू-राजकीय तणाव आणि जागतिक बाजारातील तेजीच्या प्रभावामुळे चांदीच्या भावात प्रति किलो १०० रुपयांची वाढ झाली. गुडरिटर्न्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोन्याचा भाव १० रुपयांनी कमी होऊन प्रति १० ग्रॅम १,५२,६७० रुपये झाला. त्याचबरोबर २२ कॅरेट सोन्याचा भावही १० रुपयांनी घसरून प्रति १० ग्रॅम १,३९,९४० रुपयांवर आला. चांदीच्या बाबतीत देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रति किलो १०० रुपयांची वाढ होऊन भाव २,७५,१०० रुपये झाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com