

Gold Prices Fall by ₹3,700 in 3 Days Ahead of Diwali, Silver Hits 10-Month Low
eSakal
Gold and Silver Big Price Drop Before Diwali 2026: खरं तर दसऱ्याला सोनं खरेदी करण्याचा शुभमुहूर्त असतो. मात्र, यावर्षी दसऱ्याच्याच दिवशी सोन्याच्या भावात मोठी घसरण झाली. विशेष म्हणजे, दसऱ्यानंतर आज सलग तिसऱ्या दिवशीही सोनं स्वस्त झालं आहे. गेल्या 3 दिवसांत सोन्याचा दर तब्बल 3,700 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 37,000 रुपये प्रति 100 ग्रॅमने घसरला आहे. त्यामुळे दिवाळी आणि लग्नसराईचा हंगाम सुरू होण्यापूर्वी सोन्याचे दर कोसळल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. विशेष म्हणजे, सोनं गेल्या 3 महिन्यांतील सर्वात स्वस्त दराने विकलं जात आहे.