

Gold Rate Today: Gold and Silver Prices Rise After Two-Day Decline
eSakal
Maharashtra Gold Rate : देशभरातील सराफा बाजारात नवीन वर्षात सोन्याचे भाव गगनाला भिडले होते. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ लागत होती. पण संक्रांतीनंतर सोन्याच्या भावात घसरण सुरू झाली त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू लागला. मात्र आज पुन्हा सोन्याने ग्राहकांना रडवले. दोन दिवसांच्या किंचित घसरणीनंतर आजच्या सराफा बाजारात सोन्याचे भाव प्रति तोळा ३३० रुपयांनी वाढले.