
पाच दिवसांच्या वाढीनंतर सोन्याचा दर खाली आला असून आज 24 कॅरेट सोनं 109097 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चांदीचा दरही कमी झाला असून दिल्ली बाजारात तो 500 रुपयांनी घसरून 1,28,000 रुपये प्रति किलो झाला.
सोन्याचे दर जागतिक बाजारपेठ, डॉलरची किंमत, आयात खर्च, मागणी-पुरवठा व महागाई यावर अवलंबून बदलतात.
सोने आणि चांदीच्या भावामध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत, २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १०९०९७ रुपये होता तर चांदी प्रति किलो १२४४९९ रुपये झाली. दुसरीकडे, अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, गुरुवारी, राष्ट्रीय राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याची भाव १०० रुपयांनी वाढून १,१३,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचला. त्याच वेळी, चांदीचा भाव ५०० रुपयांनी घसरून १,२८,००० रुपये प्रति किलो झाली. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याच्या आजचे ताजे भाव काय आहेत हे जाणून घेऊया.