
Summary
सलग पाचव्या दिवशी सोन्याचे दर घसरले असून २४ कॅरेट सोने ९९,६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर आले आहे.
चांदीचा भावही कमी होऊन ११३,३१३ रुपये प्रति किलो झाला आहे, जागतिक पातळीवर मात्र किंचित वाढ दिसली.
तज्ज्ञांच्या मते, सध्याची किंमत गुंतवणूकदार आणि ग्राहकांसाठी खरेदीस अनुकूल ठरू शकते.
सोने आणि चांदीच्या भावात सतत चढ-उतार सुरू आहेत. सोने सलग चौथ्या दिवशी घसरले आहे तर चांदीही उतरलीआहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, बुधवारी सकाळी २४ कॅरेट सोन्याचा भाव कमी झाला असून ९९६७० रुपये प्रति १० ग्रॅमवर इतका आहे, तर चांदीचा भाव ११३५९३ रुपये प्रति किलो इतका आहे. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे नवीन भाव काय आहे हे जाणून घ्या.