Gold Silver Price Today

Gold Price Crash: Gold Falls ₹35,000 in 20 Days, Silver Drops ₹1.85 Lakh – Check Latest Rates!

eSakal

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

Silver Rate Today: देशांतर्गत कमोडिटी आणि सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. आज सलग सातव्या दिवशी सोनं घसरल असून सर्वकालीन उच्चांकापासून 40 हजारांनी स्वस्त आहे.
Published on

Mumbai Gold and Silver Price Today: मंगळवारी सलग सातव्या दिवशी सोनं-चांदीच्या दरात घसरण दिसून आली. अमेरिका-इराण यांच्यातील तणाव कमी होण्याचे संकेत मिळाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे असलेली मागणी घटली आणि दबाव वाढून भाव आणखी खाली आले.

काल एकाच दिवसात दुपारपर्यंत सोनं सुमारे 11 हजारांनी स्वस्त होऊन 1.35 लाखांवर आल होत. मात्र सायंकाळी पुन्हा खरेदी वाढल्याने घसरण कमी होत 3 हजारांवर आली आणि सोनं 1,43,000 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होतं. आज सकाळी पुन्हा सोन्याचे भाव पुन्हा जवळपास 3 हजारांनी घसरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com