

Iran’s Decision Triggers Gold Price Drop – Check Today’s Latest Rates
eSakal
Gold Price Today: अमेरिका-इराण संघर्ष सुरू झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतींमध्ये मोठे चढ-उतार दिसून येत आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात अनेक गुंतवणूकदार अमेरिकी डॉलरकडे वळत असल्याने सोन्याच्या पारंपरिक ‘सेफ हेवन’ दर्जाबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र देशांतर्गत सराफा बाजारात सोन्याला अजूनही मोठी मागणी असल्याने दिसून येते. यातच आता सलग चौथ्या दिवशी सोन्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असून अजून भाव घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चला जाणून घेऊयात आजचे भाव...