

Gold Price Shock After 5 Days! Is Gold Getting Cheaper or Costlier in Maharashtra Today?
eSakal
Gold and Silver Price Today: देशांतर्गत बाजारात आज तब्बल 5 दिवसांनंतर सोन्याच्या भावात मोठा बदल झाला आहे. मागच्या 5 दिवसांत प्रति तोळा 6 हजार रुपयांची घसरण झाल्यानंतर आज सोन्याच्या भावात वाढ झाली आहे. अमेरिका–इराण संघर्षामुळे निर्माण झालेला भू-राजकीय तणाव आणि डॉलरमधील चढ-उतार यामुळे गुंतवणूकदारांचा कल सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळत असल्याने ही भाववाढ झाल्याचे तज्ञांचे मत आहे.