

Gold Prices Crash for 5th Day! Check Today’s Latest Gold & Silver Rates
eSakal
Gold Price Today: देशांतर्गत सोनं बाजारात आज सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव घसरल्याने सर्वसामान्य ग्राहकांना चांगलाच दिलासा मिळाला आहे. अक्षय तृतीयेनंतर जी घसरण सुरू झाली ती आठवडा संपायला आला तरी कायम आहे. मागच्या या 5 दिवसांत सोनं सुमारे 2900 रुपये प्रति तोळा इतक्या किंमतीने स्वस्त झाले आहे. त्यामुळे ग्राहकांसाठी सध्याचे बाजार भाव काय आहे ते जाणून घेणं महत्त्वाच ठरतं.