

Gold Prices Surge by ₹6,500 in Just Two Days Ahead of Dhanteras; Check 22K, 24K Rates
eSakal
Gold Silver Rate Today: धनत्रयोदशी जवळ येत असतानाच सोनं-चांदीच्या दरात पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला बसलेल्या धक्क्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या किमतीत तब्बल 8 टक्क्यांची घसरण झाली असून, दर प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आले आहेत.
त्याचबरोबर अमेरिकन डॉलरही कमजोर झाल्याने गुंतवणूकदारांचा कल सोने आणि चांदीकडे वाढला आहे. याचा परिणाम भारतीय सराफा बाजारातही दिसून येत असून सणासुदीच्या काळातच किमती वाढल्या असून ग्राहकांच्या चिंता वाढल्या आहेत.