

Gold Price Today: PM Modi’s Big Appeal Shakes Gold Market; Should You Stop Buying Gold?
eSakal
Gold Price Today: जागतिक ऊर्जा संकट आणि वाढत्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर ताण वाढत असताना काल रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना अनावश्यक सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. भारत मोठ्या प्रमाणात सोन्याची आयात करत असल्याने त्याचा थेट परिणाम देशाच्या परकीय चलन साठ्यावर आणि अर्थव्यवस्थेवर होतो. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत गरज असेल तेव्हाच सोने खरेदी करावे असे पंतप्रधानांनी म्हटल्यानंतर आज सराफा बाजारात चर्चेला उधाण आले. चला जाणून घेऊयात आजचे नवे दर काय आहेत.