
सोने आणि चांदीचे भाव सतत बदलत असतात. कधी ते वर जात असतात तर कधी खाली. पण सोने १ लाख रुपयांच्या पुढे जाऊन तेजीत आहे. जर तुम्ही रक्षाबंधनासाठी सोने खरेदीचा विचार करत असाल तर आजचा ताजा भाव जाणून घ्या. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या वेबसाइटनुसार, गुरुवारी सकाळपर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १००४५२ रुपये झाला, तर चांदीचा भाव प्रति किलो ११३४८५ रुपये इतकी होती.. २४, २३, २२, १८ आणि १४ कॅरेट सोन्याचे भाव काय आहेत ते जाणून घ्या.