Gold Rate Today .jpg
Sakal
Maharashtra Gold Rate : वर्ष संपायला अवघे काही दिवस असताना सोन्याने आपले सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. Goodreturns च्या आकडेवारीनुसार, शनिवारी, २७ डिसेंबरला दिल्लीच्या सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव एकाच दिवसात तब्बल १२०० रुपयांनी वाढून १,४१,३७० रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांकावर पोहचला आहे. त्यामुळे ऐन नववर्षाच्या सुरुवातीला आणि लग्नाच्या कालावधीत सोन्याचे भाव एवढ्या उच्चांक स्थरावर गेले असल्याने सर्वसामान्यांना आता सोनं खरेदी करण अवघड झालं आहे.