Gold Rate Today: सोन्यावर ट्रम्प इफेक्ट! एका दिवसात मोठा उलटफेर! जाणून घ्या आजचे ताजे भाव

Silver Price Today: सध्या मागील काही दिवसांपासून सोन्याच्या भावात नरमाई दिसून येत होती. मात्र आता ऐन लग्नसराईत सोन्याचे दर पुन्हा एकदा वाढल्याने खरेदीदारांच्या खिशाला फटका बसत आहे.
Gold Rate Today

Gold Prices Suddenly Change After Trump’s Statement — Check Today’s Rates

eSakal

Updated on

Gold Price Today: आज तब्बल तीन दिवसानंतर सोन्याच्या भावत मोठा उलटफेर दिसून आला. जागतिक स्थरावर अमेरिका-इराण यांच्यातील तणाव कमी होण्याची शक्यता वाढल्याने सोन्याचे भाव आज अचानक वाढले. त्यामुळे मे महिन्यात स्वस्त होतं असलेल सोनं आता सर्वसामान्य ग्राहकांसाठी महाग झालं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार होऊ शकतो असे संकेत दिल्यानंतर होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारा तेलपुरवठा पुन्हा सुरळीत होण्याच्या अपेक्षा वाढल्या. त्यामुळे कच्च्या तेलाचे भाव कमी झाले आणि सोबतच डॉलर कुंकुवत झाल्याने सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. चला जाणून घेऊयात काय आहेत आजचे भाव...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com